2019 उजाडूनही आता तीन महिने होत आले !,,,,
काळ पुढे सरकतो आहे...मागे पाहयला सवडच नाही..व पुढचं काही दिसत नाही...
पण मागचे आवाज येत राहतातच..
तिकडे दुर्लक्ष करणं हेच श्रेयस्कर. म्हातारपणात माणूस जुन्या आठवणीत जास्त रमू लागतो, असं पूर्वी वाचलंय...
माझ्या बाबतीत असं झालंय, की मला आठवतात माझ्या टीनएजमध्ये मी ऐकलेल्या क्लासिकल गाण्याच्या मैफली...भीमसेनजींच्या खूप ! जवळ जवळ दर शनिवारी. माझे वडील, दत्तोपंत देशपांडे.त्यांना आम्ही मामा म्हणायचो, ते मला घेऊन जायचे ! गाणं कुठलंही असो, ते ऐकून घरी आालो की त्यावर माझ्याशी ते चर्चा करायचे.. तासन् तास. मला त्या गाण्यातले बारकावे सांगायचे.. गाणं कसं ऐकावं याचंच मला शिक्षण मिळत गेलं ...मी समृद्ध होत गेले.. माझ्या जाणिवा प्रगल्भ होत गेल्या... कलेचं आयुष्यातलं स्थान काय असतं हे तेव्हाच उमजलं...गाण्याची गोडी लागली.. स्वतःही गात होतेच.. पण जास्त रियाज करायला हवा होता..
एकटे भीमसेनच नाही, तर अमीरखां, मल्लिकार्जुन मन्सूर, बडे गुलाम अली खां, शोभा गुर्टू, बेगम अख्तर. अशा अनेक मोठ्या मोठ्या गायकांची गाणी ऐकली. आनंदाच्या तृप्तीचा अनुभव मी त्यातून घेतला... ईश्वराच्या जवळ जाणं म्हणजे काय व ते संगीतातून कसं जाता येतं हे अनुभवलं.
पुढे सवाईगंधर्व उत्सव सुरू झाला आणि मग काय? त्यात खूप दूरदूरचे व जवळचेही गायक ऐकायला मिळाले..
जीवनाची श्रीमंती काय व कशात असते ते कळलं .
जीवनाच्या धबडग्यात पुढे हे जग माझ्यापुढून एकदम अंतर्धान पावलं....तंबोर्याच्या तारा जुळेनाशा झाल्या...
संगीत परकं झालं... मीच त्याला परकं केलं....हीच सर्वात मोठी चूक झाली माझ्याकडून. जो माझा श्वास होता, जो माझा परमानंदाचा ठेवा होता, त्यालाच मी दूर केलं...
थोडी सवड मिळाल्यावर मी पुन्हा संगीताशी नाळ जोडण्याचा प्रयत्नही केला. श्री.ना.वा. दिवाण यांचेकडे गाणे शिकण्याला सुरुवात केली..परीक्षा देण्याचं ठरवलं...त्यानिमित्ताने रियाझ होईल असा विचार केला ...
त्याप्रमाणे तिसरी परीक्षा, गांधर्व महाविद्यालयाची, दिलीही. आणि पुण्यात पहिली आले... पण ते तेवढ्यावरच राहिलं...माझं गाणं सुटलं ते सुटलंच ....ऐकणंही सुटलं... मैफलींकडे मी पाठ फरवली...
सुरांचं जाग सोडून अ-सुरांकडे वळले...
पण आजही मी टीव्ही वर यू-ट्यूबवर गाण्याचा जो आनंद घेऊ शकते, तो माझ्या वडिलांमुळेच. ते या जगात नाहीत, याला सुमारे तीस वर्षे झाली...पण त्यांनी जो मला संगीताचा 'कान' दिला ते त्यांचे माझ्यावर उपकार आहेत.ते त्यांचं ऋण आहे...
त्यांनी संगीतविषयक खूप लेख लिहिले, पण त्यावेळी आम्ही तेवढं ऍप्रिसिएशन केलं नाही... आज जे उपलब्ध लेख आहेत तेच मी गोळा करू शकले व त्याचं एक पुस्तक(ई-बुक) ई-साहित्य या साईटवर तयार होत आहे... संगीतप्रेमी ते वाचतील याची मला खात्री आहे....पुस्तकाचं नाव आहे ''मी दत्तोपंत देशपांडे बोलतोय्''
22 एप्रिल2019 ला उपलब्ध होईल. तो त्यांचा 110 वा जन्मदिवस असेल !
वडिलांच्या ऋणातून थोडंतरी मुक्त होण्यासाठी मी ते सर्व लेख स्वतः टाईप केले.
........सध्या एवढंच !!
बुधवार, 13.03.2019.

No comments:
Post a Comment