Saturday, September 7, 2013

भेट
कालची ती एक रम्य संध्याकाळ... अखिल भारतीय साहिय्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द.भि. कुलकर्णी यांना भेटायला जायचं होतं.. मी त्यांना पहिल्यांदाच भेटणार होते. पहिली भेट !कोणत्याही पहिल्या भेटीची असते तशी उत्सुकता होतीच. थोडं दडपण..थोडी धडधड..सगळंच !  वेळ आधी घेतलेलीच होती. डीएसकेविश्व संकुलात जायचं होतं. एकदा फार पूर्वी गेले होते त्या संकुलात... थोडंसं आठवत होतं इतकंच. फारसं शोधावं लागलं नाही... बर्‍याच जवळ जाऊन पोहोचले होते,,, तेवढ्यात एका बाईंनी हाक मारली, ‘ अहो, दभींकडेच आलाएत ना? मग इकडे या.’
‘द.भि इथेच राहतात ना?’...
....आणि मी बरोबर चार वाजता त्यांच्या दारापुढच्या छोट्या बागेत... छानशा ‘सिट आऊट’मध्ये उभी होते. डोक्यावर कॅनॉपी..मावळत्या सूर्याची कललेली उन्हं...
त्या बाई आणि त्यांच्याबरोबरचे लोक गेले...आणि दभी बाहेर आले...त्यांनी माझं स्वागत केलं; मी वाकून नमस्कार केला. मनात भावना होती, ते माझ्यापेक्षा वयानं, मानानं व मुख्य म्हणजे ज्ञानानं मोठे आहेत ! आदराने मी आपोआप नम्र झाले होते. कृत्रिम वागण्याचा माझा स्वभाव नाहीच... आणि तेही स्पष्ट व परखड बोलणारे, असं माहीत होतं.
आम्ही सिटआऊट मध्ये बसलो. त्यांनी संबोधित केलं, ‘संगिताताई, प्रथम तुमच्याबद्दल सांगा. घरी कोण कोण; मुलं काय करतात....’
मी थोडक्यात सांगितलं. मोठा मुलगा पॉलीमर इंजिनियर आणि उर्दू-पर्शियन मध्ये एमए. गोल्ड मेडॅलिस्ट. धाकटा मुलगा सॉलिसिटर. मुंबई च्या फर्ममध्ये पार्टनर.... मलाही त्यांच्याबद्दल विचारायचं होतं. तसं मी माहितीचं थोडं होमवर्क करून गेले होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तिकेचा आधार होता. पण मी त्यांचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. पुस्तकांची नावंही एकदम भारदस्त !...मी आर्टस् ग्रॅज्युएट नसल्याचा हा एक दुष्परिणाम आहे ! माझं साहित्याचं सखोल असं वाचन कमी पडतं.
 त्यांच्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने सांगायला सुरवात केली. त्यांचा प्रेमविवाह होता. पत्नीचं नाव शिवरंजनी ! ते नाव त्यांनीच आवडीने ठेवलं होतं. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा समारंभ पाहण्याच्या दोन महिने आधीच त्या निवर्तल्या. ते ऐकून मला वाईट वाटलं. क्षणभराच्या शांततेनंतर ते बायकोबद्दल दिलखुलासपणे म्हणाले, ‘आमचा जोडा अजिबात शोभत नव्हता..इतकी ती सुंदर होती... गोरी पान... कोकणस्थ ब्राह्मण होती ना ! आणि मी देशस्थ !..मी असा...मी माझ्या आईसारखा आहे..ती फार प्रसिध्द कुटुंबातली होती. धनंजयराव गाडगीळांची पुतणी....माझी आई ब्याण्णव वर्षांची होऊन गेली..आई खान्देशातली होती.. मी नागपूरला युनिव्हर्सिटी मधे ‘एचओडी’ होतो... त्यापूर्वी 1960 ते 64 या वर्षात मी कोल्हापूरला होतो. माझ्या आयुष्यातला तो काळ फार छान गेला....तसं सगळं आयुष्य सुखासमाधानातच गेलं... शिवरंजनी(पत्नी) होती.. (स्तब्धता....) हे नाव मीच ठेवलं होतं बरं का.. माझी विद्यार्थिनीच होती ती...आणि तुम्हाला सांगतो, तिनंच मला प्रपोझ केलं ...!’
मी ‘अरे वा’ म्हटलं आणि आम्ही दोघंही मनमोकळं हसलो... आधी आलेला ताण कमी झाला.
सर मराठीचे मोठे लेखक, ख्यातनाम समीक्षक पण त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं यावर विश्वास बसेल? पण ठेवायला हवा ! कारण तेच खरं आहे. आणि खरं आश्चर्य तर पुढेच आहे; ते म्हणाले, ‘मी मॅट्रिक पर्यंत एकही मराठी पुस्तक वाचलं नव्हतं !!’
अरे,बापरे ! असा उद्गार माझ्या तोंडून न निघता तरच नवल ! ‘पण हे कसं काय? कारण त्यावेळी तर इंग्रजी माध्यमाचं एवढं फॅड नव्हतं.’ मी स्वाभाविकपणे विचारलं.
ते उत्तरले, ‘माझे वडील रेल्वेत होते ना; मोठ्या हुद्द्यावर होते....त्यामुळे त्यांच्या सारख्या बदल्या व्हायच्या...ते जिथं जातील तिथं सेंट्रल स्कूल ला आम्हाला घातलं जायचं...’
(अरेच्या ! आईबद्दल अधिक विचारायचंच राहिलं ...मी मनात म्हटलं...कारण तेवढ्यात ते आत गेले आणि काय-काय खाद्यवस्तू घेऊन आले.)
मी त्यांचं आतिथ्य अनुभवलं. अजून आम्ही घरच्याच गप्पा मारत होतो. ‘माझी नात.. नेहा.’ त्यांनीच सुरुवात केली. ‘इथंच असते... मुलगाही इथेच असतो...आधी एअर इंडियात होता... आणखी एक फ्लॅट आहे, तिकडे जाते ती अभ्यासाला...इंजीनियरिंगला आहे.’ मी विचारल्यावर म्हणाले, ‘नाही; तिला वा*मयाची अजिबात आवड नाही बरं का !’
मनात आलं, असं बर्‍याच ठिकाणी दिसतं हल्ली. आजची पिढी ..जीवनात ..सामाजिक संघर्षात इतकी उसासारखी पिळवटून निघते आहे की त्यांना अशा कुठल्या गोष्टीत रस वाटेनासाच झाला आहे....टेक्नॉलॉजी आणि ते ! बस्...यातच ते गर्क आहेत. फक्त नेहाच नाहीः सगळेच...... काय होणार पुढे या पिढीचं? ह्या चक्रातून बाहेर पडल्यावर, ह्या वयातून ते पुढे गेल्यावर कशात आनंद शोधतील ?
‘......पण तशी शिवरंजनीलाही साहित्याची आवड नव्हती...’ दभी म्हणाले. मी काय बोलणार?
‘मला Astrology ( फलज्योतिष) या विषयातही खूप रुची आहे, बरं का’ दभी पुढे म्हणाले. मग आम्ही त्या विषयावर थोडं बोलत राहिलो. मला काही प्रश्न विचारून त्यांनी माझी रास कुठली असेल याचा अंदाज केला आणि तो चक्क बरोबर होता. (अरेच्या ! त्यांची रास कुठली, हे विचारायचंच राहिलं !) त्यानंतर आमचं गझल बद्दल बोलणं सुरू झालं. 
दभींची साध्या संभाषणाची भाषा देखील अलंकारप्रचुर आहे... शब्दांचा नेमकेपणा...आणि ते शब्दही आपल्या नेहमीच्या वापरातील नव्हेत ! ठेवणीतले ! जणू भरजरीच.
मी बोलत होते, ‘मुक्तछंद ज्या काळात खूप फोफावला होता, त्या काळात गझल लिहिली जाऊ लागली. गझल ही वृत्तबद्ध कविता असल्याने तिची प्रथम खूप उपेक्षा झाली....वगैरे.’
मात्र, दभी वृत्तबद्ध कवितेच्या बाजूने होते, हे पाहून मला बरे वाटले. ते म्हृणाले, ‘मुक्तछंद म्हणजे तोडून तोडून गद्य लिहिणं नव्हे. अजूनही कवींचा त्याबाबत तसाच समज आहे. तो गैरसमज सोडला पाहिजे. मुक्तछंद म्हणजे, एखादा आहे तो छंद मुक्त करणं. उदाहरणार्थ, पादाकुलक घेऊ; जो सोळा मात्रांचा असतो. त्यात कधी पंधरा तर कधी सतरा मात्रांच्या ओळीत लिहिणं; असं त्या जखडलेल्या छंदाला मुक्त करणं, म्हणजे मुक्तछंद ! सर्व छंदांपासून मुक्त होणं नव्हे....कालप्रवाहाच्या विरुद्ध पोहोणं नव्हे.’
दभी बोलत राहिले, मला तरी दुसरं काय हवं होतं? मी होता होईल तेवढं टिपून घेत होते...पॅडवर पेननेही आणि मनात टीपकागदाप्रमाणेही...!
‘तुम्ही गझलकार कवयित्री आहात म्हणून माझे गझलबद्दलचे विचार सांगतो. गझलेचे चार टप्पे मी मानतो. 1.गझलसदृश रचना 2. माधव ज्यूलियन यांनी जाणीवपूर्वक लिहिलेल्या गझला.(पण गज्जलांजली या संग्रहात त्यांनी स्वतःच म्हटलं आहे की त्या गझला त्यांनी केवळ प्रयोग म्हणून लिहिल्या आहेत—दभी) 3. सुरेश भटांची शुध्द स्वरूपातील गझल. अंतरंग उकलणारी गझल... बेहोशी व तन्मयतेने लिहिलेली गझल. प्रयोग म्हणून नव्हे, वृत्ती व आंतरिक हाकेला ओ देण्यासाठी लिहिलेली गझल...भावनेचा आविष्कार म्हणून आलेली गझल... त्यांचं कार्य मोठं आहे.. त्यांनी गझला नुसत्या लिहिल्या नाहीत तर गझलेचा प्रसार,प्रचार केला...कवींना मार्गदर्शन केलं..ते गझल साठी झटले....’दभी बोलत राहिले, ‘आणि चौथा टप्पा...4.भटांनंतरची गझल..
‘ पण मी मर्ढेकरांचा चाहता..... त्यांचा भक्तच ! मर्ढेकर आणि भट, यांची अगदी विरुध्द प्रकृती...म्हणजे काव्यप्रकृती.....सौंदर्यशास्त्रानुसार कविता ही वाचनार्थ असते,श्रवणीय नसते; कवितेत चिंतन,वैचारिकता, ज्ञानात्मकता असते, हे मर्ढेकरांचे म्हणणे; तर भटांच्या मते ती समूहाने श्रवण करायची असते. भटांनी कवितेचं नातं वक्त्तृत्व, संगीत आणि नृत्याशी जोडलं. ते स्वतः गझल गाऊन म्हणत हे आपल्याला ठाऊकच आहे. आज गोकुळात रंग....सारख्या त्यांच्या रचना तर मला नृत्याविष्कारच दाखवतात. मी भटांच्या सत्तावीस अशा रचना शोधून काढल्या आहेत की ज्यात मला नृत्य दिसतं ! कविता ही अर्थनृत्य पूर्ण असेल तर आस्वादाचा आनंद अलौकिकच म्हटला पाहिजे.
‘म्हणजे मला म्हणायचं आहे की मर्ढेकर कवितेला शुध्द करत होते, तर भट इतर कलांना बरोबर घेऊन कवितेला समृध्द करत होते ! भटांची कविता ही त्यामुळे लोकानुरंजन करते.’
दभीं नी मुद्दाम अधोरेखित केले,  ‘मी भटांचा निःसीम चाहता आहे, बरं का ! आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. मराठी संप्रदायात  चारच प्रवर्तक कवी होऊन गेले. एक केशवसुत, दुसरे तांबे, तिसरे मर्ढेकर आणि चौथे आहेत सुरेश भट. भट हे मनस्वी, बेहोश, व्यवहाराची पर्वा न करणारे... भटांवर, मला वाटतं, श्रीकृष्ण पोवळेंचा प्रभाव होता. अगदी सुरवातीला होता. आणि पोवळ्यांवर उमरखय्यामचा.
‘मी मघाशी सांगितल्याप्रमाणे मर्ढेकरवादी असलो तरी भटांचा चाहता आहे. माझं पुस्तक ‘सुरेश भट—नवे आकलन’ जरूर पाहा.
‘मी म्हणतो, भटांच्या कवितेचा पक्षी माझ्या मणिबंधावर बसतो, मी त्याला आसुसून पाहातो; पण तो उडतो, पंख पसरतो तेव्हा त्याच्या पंखाच्या आतले आकर्षक रंग मला मोहवून टाकतात....
‘मी असं म्हणतो याला कारण आहे.  त्यांच्या कविता-गझलेची पहिली ओळ वाचतो; म्हणजे त्या पक्ष्याला पाहतो; पण दुसरी ओळ? ती सामर्थ्यवान असते... पक्षी उडाल्यावर ते आतले रंग ...वाः ! सुंदर !
उदाहरण सांगू ?...   
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल....         किंवा---
दूर दूर तारकात बैसली पहाट न्हात
                   बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग..
पाहिलेत दुसर्‍या ओळीतले अनोखे रंग ?’
दभीं नी दिलेल्या सुंदर उपमेत मी हरवून गेले. क्षणभर निःशब्दच झाले. माझ्या मनगटावर खरोखरचा एक देखणा पक्षी बसला. मनमोहक रंगाचा...आणि पंखाच्या आत भारद्वाजा सारखे, फ्लेमिंगो सारखे भगवे-गुलाबी रंग असलेला...आणि पंख पसरून उडतांना मी तो पाहिला...!
आणखीही खूप बोलणं झालं. किती साठवायचं?किती आठवायचं ? तो पक्षी..त्या पक्ष्याची पिसं जणू मनावरून फिरत होती...
सिट-आऊट मधल्या सोफ्यावरून, डीएसके विश्व च्या उंचीवरून आता पुणं तेजाळलेलं दिसत होतं. आकाशात चंद्र होता, पण एक तुकडा उडालेला. तो माझ्या ओंजळीत तर नव्हता ना पडला? तसंच असावं...तरीच माझ्या मनात प्रसन्न शिंपडण झालेली जाणवत होती....काळ्या आकाशाच्या पडद्यावर धायरीचे दिवे चमचमत होते...माझ्या आनंदाची पौर्णिमा घेऊन मी निघाले. एक बौध्दिक, साहित्यिक, निखळ आनंद ! आज दभींसमोर बसून मी चक्क गप्पा मारल्या ?..खरंच; मी त्यांच्या कॉलेजात का नव्हते? त्यांची विद्यार्थिनी म्हणून ? अशी कितीतरी लेक्चर्स ऐकायला मिळाली असती ! पण आज...पण इथंच थांबायचं नाहीए....
आज कालच्या संध्याकाळच्या आठवणी मनात ताज्या होत होत्या. वाटत होतं, कालच्या प्रमाणेच गाडी काढावी...जावं...पुन्हा पुन्हा जात रहावं... अजून खूप ऐकायचं आहे...खूप समृध्द व्हायचंय्... खूप काही विचारायचं राह्यलंय्...मिळालं खूप ...तृप्ती? हो, आहे; पण अतृप्ती जास्त आहे...कळतंय् की ती ज्ञानगंगा आहे..... मी ओंजळीनं किती घेणार? माझी क्षमता ती काय ! वाटलं, अतृप्ती हे देखील एक वरदान असतं...ते तुम्हाला पुन्हा त्या ज्ञानगंगेच्या प्रवाहाशी नेऊन उभं करतं....यालाच म्हणतात सार्थक...!
                                                    
-------------------------------------------------------------------------------------------------------

Saturday, August 24, 2013

24.8.13
प्रिय,
आज एकाकीपणाची कविता कुठेतरी वाचली आणि तुझी तीव्र आठवण झाली. कवितेतलं राक्षसप्राय आभाळ माझ्या अंगावर झेपावलं नि त्यानं मला चारही अंगांनी वेढून घेतलं. त्याच्या विक्राळ, गरगर गिरक्यांमध्ये फिरतांना संवेदनाहीन होऊन मी डोळे मिटून घेतले होते,एक हात बाहेर काढून. वाटलं होतं तू कुठून तरी अचानक येऊन धरशील माझा तो हात; आणि या गरगर भोवर्‍यातून मी बाहेर पडेन. सहीसलामत. केव्हातरी सारं थांबलं. जिथल्या तिथं. आभाळ जागच्या जागी गेलं आणि मी तिथे कवितेच्या ओळीत निपचित पडलेली सापडले,माझी मला.भोवंडून गेल्यामुळे त्राण सरलेली. पण मन कुठेतरी शांत झालं होतं. निमालं होतं. तूच जणू भेटून गेल्यासारखं. मग वाटलं ही एकाकीपणाची कविता खरी नाहीच. एकाकीपणा कधी खरा नसतोच ! काहीच पूर्ण अर्थानं एकाकी नसतं. आभाळाजवळ शून्यत्व असतं. मातीजवळ ममत्व.माझ्याजवळ तुझा भास आहे; तुझ्याजवळ माझी हाक. आपण एकाकी असतांनाच एकाकी नसल्याची ही प्रसन्न जाणीव आपलं तसं एकाकीपण संपवून टाकते. असं लोभस एकाकीपण कोणाला नको वाटेल? असं हवंसं वाटणारं एकाकीपण. समागमानंतर एकमेकांकडे पाठ करून विसावलेल्या जोडप्याच्या तृप्त, आत्ममग्न विसाव्यासारखं. अंगभर पसरलेलं. दुखरं तरीही सुखद. एकाकीपणाच्या गाभ्यात असतात असंख्य बहर,असंख्य इंद्रधनुष्यं !.......
तू आणि मी कधीच एकाकी होणार नाही आहोत; हो ना?
                  साजण.
                  त्याचं स्वप्नचित्र रेखाटतांना
                  उलगडताहेत...गंधाळताहेत रातराणी...
                  शृंगारलेल्या मधुमीलनाच्या आत्मविस्मृत रात्री...
                  पहाटवार्‍याच्या धीट नि आडदांड
                  धसमुसळेपणानंच,तेव्हा
                  निखळून पडते एकेक पाकळी त्या रात्रीची..
                  सावरता येत नाहीत अशावेळी पूर्वेचे वाहणारे रंग...
                  प्रकाशाच्या आरोहात, का असे विरून जातात प्रीतीचे सूर?
                  आणि सुरू होतात स्वप्नांचे अवरोह?
                  साजण ...निघून गेलेला...
                  धप्प ! कोसळलेलं वास्तव...!
                  मऽऽऽ गऽऽऽ रेऽऽऽ

                  साऽऽऽ......साजणाचा !

Sunday, August 11, 2013

तो आणि ती... आधुनिक काळातले...

            गजबजलेली संध्याकाळ...  मोटरसायकल कशीबशी पार्किंगच्या असंख्य टू-व्हीलर्स मध्ये घुसवून तो के एफ् सी त शिरला. एकही टेबल रिकामं नाही...? काउंटर वर त्यानं टेबलासाठी बुकिंग केलं... आणि एण्ट्रन्स पाशी येऊन थांबला...सेलफोन..'' हं.. बोल.. मी पोहचलोय्... काय?.... बंद पडलीय्?... तिथेच पार्क करून ये ना... हो, तुला कळतंय् हे मलाही कळतंय्.... ओके.. लवकर..ये...''
      थोड्या वेळातच ती येते.. ''हाय् ! थँक गॉड..टेबल ..जागा तरी चांगली मिळाली...ए, काय घेऊ या..ऑर्डर...''
      '' मी दिलीय्. मला माहीत आहे, तुझी इथली फेवरीट डिश कुठली ते...''
'' ओके..हं बोल .तुला माझ्याशी काहीतरी विशेष बोलयचंय्, म्हणाला होतास ना?''
'' या... लिसन.. मला यूएस्. ला ऍडमिशन मिळालीय्. पुढच्या पंधरा दिवसात निघावं लागेल...सो...'' तो.
      '' बघ, मी म्हटलंच होतं...तुला ईझीली मिळेल म्हणून...''
      '' मग? यावर काय म्हणायचंय् तुला?...आपल्या रिलेशन बद्दल तुझ्या घरी माहीत आहे...तुझे पेरेंट्स काय म्हणतील?''
      '' तू आता पाच वर्षं राहणार ना तिकडे ?..'' ती.
      '' पण आपण रोज भेटूच नं... ईमेल..आहे.. फोन आहे...वेबकॅम.... बघू सुध्दा शकू.. आणि वर्षातून एकदा मी येऊ ही शकेन...पण ते आत्ताच सांगता नाही येणार..'' तो. 
      '' हं...मीही बिझी असेन माझ्या अभ्यासात.....'' ती.
      '' थांबलीस का ? बोल ना.. तुला काहीतरी म्हणायचंय्...'' तो अपेक्षेनं तिच्याकडे पाहातो.
      पण ती गप्प. '' हे बघ, मी तुझ्या आई-बाबांना येऊन भेटावं असं तुला वाटतंय् का?...तर मी...  ''
      त्याला मधेच थांबवत ती म्हणते,...'' नाही रे! मी प्रॅक्टिकली विचार करतेय्.. पाच वर्ष म्हणजे काही थोडा काळ नाही.. या पाच वर्षात काहीही घडू शकतं...काळाबरोबर आपण दोघंसुध्दा बदलू शकतो... मागली पाच वर्ष आठवून बघ. आपल्यात सतत बदल होत असतात...साध्या साध्या गोष्टीत सुध्दा...''
      '' शुअर...आधी मला नूडल्स खूप आवडायच्या.. पण यू नो? आय् जस्ट डोण्ट लाइक ईव्हन द आयडिया...'' तो उगाचच जोक करायचा प्रयत्न करतो.
      '' लुक्, आय एम सीरीयस..'' ती खरंच गंभीर होते. '' ओके ,तू जोक मधे म्हणालास तेच खरं असेल तर ? आज तुला मी आवडते आहे, सपोज्, उद्या तुझं मत बदललं... म्हणजे बदलूही शकतं... किंवा माझंही... हो ना? ''
      '' तुला नेमकं काय म्हणायचं आहे ? '' त्याचा लाइट मूड विरघळून जातो.
ती म्हणते, '' विचार करून बघ ना, तू परदेशी वातावरणात, वेगळ्या कल्चर मधे जाशील. नवे मित्र-मैत्रिणी होतील..तुझ्या सवयी बदलतील...यू विल बी एक्सपोज्ड टु अ टोटली न्यू ऍटमॉसफिअर...मग कदाचित तुझं मन इतरांशी माझी तुलना करेल...इथल्या गोष्टी तुला बंधनकारक वाटायला लागतील....''
      '' पण म्हणून आपलं प्रेम....'' तो.
      '' ऐक, मी म्हणते तसंच होईल असं नाही मला म्हणायचं. पण पाच वर्ष खूप मोठा काळ आहे, म्हणून मी एक शक्यता वर्तवली..''
     '' तू म्हणतेस ते योग्यच आहे, असं मला पटायला लागलंय्..''
      '' माणसानं प्रॅक्टिकली विचार करावा असं मला वाटतं. आणि जर मी म्हणते तसं काही नाही घडलं, तर आपली रिलेशनशिप आपण कण्टिन्यू करणारच आहोत....पण लेट अस बी ओपन...'' तिचे विचार स्पष्ट होते.
      '' मीच नाही, तूही नव्या सिच्युएशन ला सामोरी जाणार आहेस...''
      '' हो, असं समजू या की ही आपली टेस्ट आहे ! सगळं असंच राहिलं तर वेल एण्ड गुड ! पण नाही राह्यलं तर, 'आता हे त्याला/तिला कसं सांगू' असं दडपण दोघांनाही वाटता कामा नये..'' ती जणू त्याला समजावीत होती.
      तो डिश संपवत होता म्हणून काही बोलला नाही की बोलायला काही उरलं नाही म्हणून गप्प झाला ते कळत नव्हतं.
      तीच म्हणाली, '' केव्हा निघतोयस् मग?''
'' सतरा तारखेच्या रात्री..''
'' ओके, विश यू गुड लक एण्ड सक्सेस.''
'' आय् विल बी इन टच्..''तो.
'' हो मी सुध्दा...''ती
      ''निघायचं ?'' त्यानं विचारलं. ''हो, तू मला त्या ब्रिज पाशी सोड. ऍक्टिवा बंद पडलीय ना, तिचं पाह्यला पाहिजे...''
      दोघं एकाच मोटर-सायकलवर गेले. मात्र त्यांचा पुढचा प्रवास एका वाटेने होणार आहे का रस्ते वेगळे होणार आहेत याची फिकीर त्या क्षणी दोघांनाही नव्हती.....
                                                            संगीता जोशी.

Saturday, August 3, 2013

      सुभाषिते...
                                          संगीता जोशी
                 
       देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
      एक दिवस घेता घेता, घेणार्‍याचे हात घ्यावे...
कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. आता ह्या ओळी पहा, ‘’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’’ह्या ओळी कुसुमाग्रज यांनी सागराला उद्देशून म्हटल्या आहेत. हे दोघेही ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी आहेत.
   सुरेश भट यांच्या ह्या ओळी पाहा,
      उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
अशा ओळी सहज सर्वांच्या ओठी घोळतात.एकवेळ कवीचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या ओळी मात्र नेहमीच्या वापरातले वाक्प्रचार वापरावेत, तशा वापरल्या जातात. त्यामुळे ते कवी अजरामर झालेले असतात. ह्यांनाच म्हणतात, सुभाषिते.
      अशीच एक ओळ...’’आहे मनोहर तरी गमते उदास’’ तुम्हाला आठवलं ना की सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं ‘’आहे मनोहर तरी..’’हेच शीर्षक आहे!
      पण ज्या कवितेतील ही ओळ आहे, ती कविता वा तो कवी आपल्याला
फारसा माहीत नाही. ते कवी होते, दिनकर नानाजी शिंदे. त्यांनी सरस्वतीकंठाभरण ह्या टोपण-नावाने लेखन केलं आहे.
पूर्वी, कवितेची एखादी ओळ देऊन कवींना समस्यापूर्ती करण्यास सांगत असत. म्हणजे, दिलेली ओळ आणखी ओळी लिहून त.यात गुंफायची. आहे मनोहर तरी गमते उदास, या ओळीची समस्यापूर्ती करणारी आठ कडवी दिनकर नानाजी शिंदे यांनी लिहिली. ती सगळीच कविता फार सुंदर आहे. सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत , आणि त्यामुळे येणारे औदासीन्य प्रत्येक कडव्यात आलेलं आहे. त्यातील काही कडवी अशी आहेत... कविता वसंततिलका या वृत्तात लिहिलेली आहे.
      सर्वांगसुंदर,सुभूषण वस्त्रयुक्त । चैतन्य, वाणि, मन,बुध्दिहि ज्या प्रशस्त ।
ऐसे शरीर, परि शील नसे तयास । आहे मनोहर तरी गमते उदास ।। 
खरंय् ना ? एखाद्या व्यक्तीजवळ शरीरसौष्ठव आहे,ते सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेलं आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, ती व्यक्ती बोलण्यात चतुर आहे,मनानं निर्मळ आहे, बुध्दिमानही आहे, पण त्या व्यक्तीची वागणूक मूल्यांना धरून नाही, तर ते सर्व गुण वाया गेले असेच नाही का?
पुढील कडवे असे आहे..
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी । उद्यान एक भरले लतिका-विशेषी।
तेथे परंतु न वसंत करी विलास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।
एखाद्या उद्यानात आंब्याची डौलदार झाडं आहेत, विशेष प्रकारच्या सुंदर वेली आहेत, पण या सगळ्यावर मोहोरच नाही, फुलांचा वसंतच नाही,तर काय उपयोग? पुढे कवी लिहितो,
निद्रेत मी नृपति होउनि सौख्य भोगी ।
की चित्पदी मिळुनि जाइ बनोनि जोगी ।
जेव्हा कळे सकल हा परि स्वप्नभास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।
---एखादेवेळी आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपण राजा असतो,सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असतात;किंवा एखादेवेळेस स्वप्नातच आपण कुणी योगी असतो; आपली साधना सफल होऊन आपण ईश्वरचरणी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो....ही दोन्ही स्वप्ने आनंद देणारी आहेत.. पण ती स्वप्नेच आहेत. जाग आल्यावर जेव्हा कळतं की तो आनंद क्षणिकच होता, तेव्हा मन अगदीच उदास होऊन जातं...
पण उदास न होता आपण शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा असतो.
तसा आनंद शोधणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे !

                                                संगीता जोशी      सुभाषिते...

Saturday, July 27, 2013

तो आणि ती...पूर्वीच्या काळातील...

                        एक टिपूर चांदणी रात्र ....त्रिपुरी पौर्णिमा असावी तसं.... हवेत हवाहवासा वाटणारा गारवा. (टिपूर शब्दाचा उगम त्रिपूर याच शब्दात असावा ) नदीचा बांध... गावापासून दूर... अगदी गावाच्या सीमेपार...सायंकाळपासूनच ती दोघं होती. त्या बांधावर...आतुरतेनं एकमेकांना भेटलेली. उत्कट प्रेमानं भरलेल्या मनानं..दोघांनाही खूप बोलायचं होतं..खूप सांगायचं होतं... पण संभाषणच अडलं होतं... ''किती थंडी आहे, नाही?''  आणि  ''हळूहळू वाढणारच आहे !''  या पलीकडे शब्द सरकत नव्ह्ते.
      ''उद्या किती वाजताची गाडी ?'' काहीतरी विचारायचं तसं ती विचारते.
तंद्रीतून जागं झाल्यासारखं तो उत्तरतो,  '' चारची. ''
      '' मी येऊ स्टेशनवर ? ''
      '' कशाला ?.... उगीच... सगळे असतील... ''
      '' मग आजच निरोप द्यायचा मी?''
      '' अगं, मी पुन्हा येईनच ना लवकर..''
      '' म्हणजे? परीक्षा अलीकडे आल्याएत? '' ती.
      '' नाही गं. परीक्षा झाल्यावरच... नेहमीप्रमाणे...''
      '' म्हणजे अजून सहा महिने.! तिचा कापरा स्वर.
      '' हे बघ, तू असं बोललीस तर माझा अभ्यास होणार नाही.'' तो.
      ''................'' तिचं मौन.
      '' आणि हो, मला दर आठवड्याला पत्र आलं पाहिजे हं तुझं. हॉस्टेलवर फोन घेता येत नाही !'' तो आर्जवून सांगतो.
      ती म्हणते, '' दर आठवड्याला नाही जमलं, तर?''
'' ते काही नाही !'' तो अधिकारानं सांगतो, '' नाहीतर माझं अभ्यासात लक्ष लागणार नाही....'' ती हसते अन् म्हणते, '' तूही पाठवशील ना ? का मला वाट पाहायला लावशील?''
'' पाठवीन. पण एखादेवेळी नाही जमलं तरी तू रागवायचं नाही..''
तिला माहीत असतं की तो पत्रातून हेच लिहिणार आहे ' रागावू नकोस, बरेच दिवसात लिहू शकलो नाही.....खूप सबमिशन होतं ...परीक्षाही जवळ येतेय्...'
      पुन्हा बांधावर ती भानावर येते..तो म्हणतो, '' चांदणं किती छान पडलंय् नं? चंद्र पहा किती सुंदर आहे ! मी गेलो ना, की तू रोज ह्या चंद्राकडे पाहात जा. मीही त्याचवेळी तिकडे चंद्राकडे पाहीन. हा चंद्र आपल्यामधे कॉमन. म्हणजे आपण शेजारीच उभे आहोत असे वाटेल. नाही का?''
'' पण चंद्र काही रोज नसतो... अमावास्या येतच असते.. तेव्हा ?... '' ती.
''तेव्हा अंधार हाच कॉमन फॅक्टर..गंमत आहे नं? '' तो तिची समजूत घालतो.
पुढे म्हणतो, '' बरं, उद्या मी जाणार ! आजच्या या चांदण्या रात्रीची आठवण राहील असं एखादं गाणं म्हण ना ...''
''नको, आसपास इतरही माणसं आहेत..'' तिचा मूड नसतो.
'' लांब बसलेली आहेत ती. लहान आवाजात म्हण पाहिजे तर..फक्त मला ऐकू येईल असं...''
ती संकोचते. खांद्यावरचा त्याच्या हाताचा स्पर्श तिला आग्रह करतो. आणि त्या ऊबदार क्षणी तिचे स्वर उमटतात...
      ''  रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला
         आज चांदनी की नगरी में अरमानों का  मेला....''
पण ती रात्र काही थांबणार नसते... आणि तो चंद्रही....!
काळही थांबणार नसतो....ते शंकर-जयकिशन...ती मीनाकुमारी, राजेन्द्रकुमार..राजकुमार ......सगळयांवर कधीच काळाचा पडदा पडला...
      पण असे कित्येक ''तो आणि ती'' आहेत ज्यांच्या मनात त्या सुरांचं एक शिल्पित मंदिर कायमचं उभारलं गेलंय्...दिल एक मंदिर...  

                                          संगीता जोशी.
---------------------------------------------------------------------------------------