तो आणि ती... आधुनिक काळातले...
गजबजलेली संध्याकाळ...
मोटरसायकल कशीबशी पार्किंगच्या असंख्य टू-व्हीलर्स मध्ये घुसवून तो के एफ्
सी त शिरला. एकही टेबल रिकामं नाही...? काउंटर वर
त्यानं टेबलासाठी बुकिंग केलं... आणि एण्ट्रन्स पाशी येऊन थांबला...सेलफोन..''
हं.. बोल.. मी पोहचलोय्... काय?.... बंद पडलीय्?... तिथेच पार्क करून ये ना... हो,
तुला कळतंय् हे मलाही कळतंय्.... ओके.. लवकर..ये...''
थोड्या वेळातच ती येते.. ''हाय् ! थँक गॉड..टेबल ..जागा तरी
चांगली मिळाली...ए, काय घेऊ या..ऑर्डर...''
'' मी दिलीय्. मला माहीत आहे, तुझी इथली फेवरीट डिश कुठली ते...''
'' ओके..हं बोल .तुला माझ्याशी
काहीतरी विशेष बोलयचंय्, म्हणाला होतास ना?''
'' या... लिसन.. मला यूएस्. ला
ऍडमिशन मिळालीय्. पुढच्या पंधरा दिवसात निघावं लागेल...सो...'' तो.
'' बघ, मी म्हटलंच होतं...तुला ईझीली मिळेल म्हणून...''
'' मग? यावर काय म्हणायचंय् तुला?...आपल्या रिलेशन बद्दल तुझ्या
घरी माहीत आहे...तुझे पेरेंट्स काय म्हणतील?''
'' तू आता पाच वर्षं राहणार ना तिकडे ?..'' ती.
'' पण आपण रोज भेटूच नं... ईमेल..आहे.. फोन आहे...वेबकॅम.... बघू
सुध्दा शकू.. आणि वर्षातून एकदा मी येऊ ही शकेन...पण ते आत्ताच सांगता नाही
येणार..'' तो.
'' हं...मीही बिझी असेन माझ्या अभ्यासात.....'' ती.
'' थांबलीस का ? बोल ना.. तुला काहीतरी म्हणायचंय्...'' तो
अपेक्षेनं तिच्याकडे पाहातो.
पण ती गप्प. '' हे बघ, मी तुझ्या आई-बाबांना येऊन भेटावं असं तुला
वाटतंय् का?...तर मी... ''
त्याला मधेच थांबवत ती म्हणते,...'' नाही रे! मी प्रॅक्टिकली
विचार करतेय्.. पाच वर्ष म्हणजे काही थोडा काळ नाही.. या पाच वर्षात काहीही घडू
शकतं...काळाबरोबर आपण दोघंसुध्दा बदलू शकतो... मागली पाच वर्ष आठवून बघ. आपल्यात
सतत बदल होत असतात...साध्या साध्या गोष्टीत सुध्दा...''
'' शुअर...आधी मला नूडल्स खूप आवडायच्या.. पण यू नो? आय् जस्ट
डोण्ट लाइक ईव्हन द आयडिया...'' तो उगाचच जोक करायचा प्रयत्न करतो.
'' लुक्, आय एम सीरीयस..'' ती खरंच गंभीर होते. '' ओके ,तू जोक
मधे म्हणालास तेच खरं असेल तर ? आज तुला मी आवडते आहे, सपोज्, उद्या तुझं मत
बदललं... म्हणजे बदलूही शकतं... किंवा माझंही... हो ना? ''
'' तुला नेमकं काय म्हणायचं आहे ? '' त्याचा लाइट मूड विरघळून
जातो.
ती म्हणते, '' विचार करून बघ ना,
तू परदेशी वातावरणात, वेगळ्या कल्चर मधे जाशील. नवे मित्र-मैत्रिणी होतील..तुझ्या
सवयी बदलतील...यू विल बी एक्सपोज्ड टु अ टोटली न्यू ऍटमॉसफिअर...मग कदाचित तुझं मन
इतरांशी माझी तुलना करेल...इथल्या गोष्टी तुला बंधनकारक वाटायला लागतील....''
'' पण म्हणून आपलं प्रेम....'' तो.
'' ऐक, मी म्हणते तसंच होईल असं नाही मला म्हणायचं. पण पाच वर्ष
खूप मोठा काळ आहे, म्हणून मी एक शक्यता वर्तवली..''
'' तू
म्हणतेस ते योग्यच आहे, असं मला पटायला लागलंय्..''
'' माणसानं प्रॅक्टिकली विचार करावा असं मला वाटतं. आणि जर मी
म्हणते तसं काही नाही घडलं, तर आपली रिलेशनशिप आपण कण्टिन्यू करणारच आहोत....पण
लेट अस बी ओपन...'' तिचे विचार स्पष्ट होते.
'' मीच नाही, तूही नव्या सिच्युएशन ला सामोरी जाणार आहेस...''
'' हो, असं समजू या की ही आपली टेस्ट आहे ! सगळं असंच राहिलं तर
वेल एण्ड गुड ! पण नाही राह्यलं तर, 'आता हे त्याला/तिला कसं सांगू' असं दडपण
दोघांनाही वाटता कामा नये..'' ती जणू त्याला समजावीत होती.
तो डिश संपवत होता म्हणून काही बोलला नाही की बोलायला काही उरलं
नाही म्हणून गप्प झाला ते कळत नव्हतं.
तीच म्हणाली, '' केव्हा निघतोयस् मग?''
'' सतरा
तारखेच्या रात्री..''
'' ओके, विश यू
गुड लक एण्ड सक्सेस.''
'' आय् विल बी
इन टच्..''तो.
'' हो मी
सुध्दा...''ती
''निघायचं ?'' त्यानं विचारलं. ''हो, तू
मला त्या ब्रिज पाशी सोड. ऍक्टिवा बंद पडलीय ना, तिचं पाह्यला पाहिजे...''
दोघं एकाच मोटर-सायकलवर गेले. मात्र त्यांचा पुढचा प्रवास एका
वाटेने होणार आहे का रस्ते वेगळे होणार आहेत याची फिकीर त्या क्षणी दोघांनाही
नव्हती.....
संगीता
जोशी.
No comments:
Post a Comment