काल पुन्हा देव आहे की नाही याबद्दल चर्वा झाली.
गिरिशभावजींनी विचारलं आपण एकच देव का मानत नाही?
अल्ला व येशू हे जसे मुस्लिम व ख्रिश्चन यांचे सर्वांचे एकच देव आहेत, तसं आपलं का नाही?
मी म्हटलं देव म्हणजे प्रकाश ऊर्जा आहे...एकच परमेश्वर !
त्यालाच आपण वेगळी वेगळी नावं दिली आहेत,
सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे...
आणि खरंच , ऊर्जांची रूपं ही निरनिराळी नाहीत का?
विद्युत, चुंबकीय, उष्णता, प्रकाश....इ.
एकमेकात रूपांतरित होऊ शकतात, पण नाश होत नाहीत...
हाच देवाचा गुणधर्म नाही का?
ऊर्जा दिसत नाही , पण तिचे परिणाम आपण अनुभवू शकतो...
तसंच देवाचं नाही का?
त्याची कृपा आपण अनुभवू शकतो...
तो रागावत नाही, आपली कर्मे आपल्याला चांगली- वाईट फळे देत असतात.
वाईट फळांची तीव्रता आपण ईश्वर-कृपा संपादून, कमी करू शकतो...
22.9.2024
No comments:
Post a Comment