3rd Feb 2016
काल एक video , WhatsAppवर आला. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या गाण्याचा. 6-7 मिनिटांचाच. पण तरुणपणचं त्यांचं ते गाणं. इतका जोश, इतका फोर्स, इतक्या जोरकस ताना ! लढाई केल्यासारखी फिरत आणि दाणकन् घाव घातल्यासारखी सम पकडणं ! पण नजाकत तेवढीच ! वा ! तिन्ही सप्तकातल्या ताना नुसत्या बरसत होत्या. चीज होती 'मोहमदशा रंगीले रेऽ बलमा; तुमबिन मै का कारी बदरिया, निक ना सुहावे..'
राग बहुधा सुहा कानडा. पण वेगळा कानडाही असू शकेल....स्तिमित झाले. मैफल खाजगीच होती. मोजकेच श्रोते...त्यात माझे वडील दत्तोपंत देशपांडे श्रोत्यांमधे समोरच होते..त्यांच्या शेजारीच डॉ. नानासाहेब देशपांडे.
सवाई गंधर्वांचे जावई. तबल्याच्या साथीला चंद्रकांत कामत. हार्वमोनियमर एकनाथ ठाकूर. तानपुर्यावर मागे वत्सलाबाई ! (सौ. भीमसेन). दुसर्या तंबोर्यावर साळगावकर. सगळेच परिचित. पण ह्यापैकी कोणीही आज हयात नाहीत ! सगळ्यांबद्दल दुःख होतंय्.... संगीताचं हे जग मी किती जवळून अनुभवलं आहे ! माझ्या तारुण्यावस्थेत मी ह्याच जगात हरवून गेलेली होते.
भीमसेन तेव्हा उभरते घायक होते. नुकतेच पुण्यात आलेले.मी तेव्हा त्यांची जवळ जवळ प्रत्येक मैफल ऐकली. त्यांची नुसती चाहतीच नाही, भक्त झाले.
कोण विश्वास ठेवेल की ते तेव्हा आमच्या लक्ष्मी रोडच्या घरी गणपती चौकात. सायकलवर यायचे. वडिलांना खालूनच हाक मारायचे, 'पंतऽऽ....'
हाक ऐकून मामा (मी वडिलांना मामा म्हणायची) गॅलरीत जायचे;म्हणायचे, भिमण्णा, वरती या; रजनी (माझे माहेरचे नाव) तुम्हाला चहा घेतल्याशिवाय सोडायची नाही.' मग भीमसेन देवळापाशी सायकल लावायचे; वर यायचे . मी मनापासून चहा बनवायची. चांगला होईल अशी काळजी घेऊन...
माझं वय तेव्हा असेल पंधरा -सोळा किंवा त्याहूनही कमी !मग दोघांच्या गप्पा मी ऐकत बसायची...
अशा रीतीने मी हिमालय घडतांना पाहिला आहे! तेव्हा थोडंच माहीत होतं आपण एका 'भारतरत्न'व्यक्तीसमोर उभे आहोत?
सीता कागल. पुण्याचे त्यावेळचे पोलिस कमिशनर कागल यांच्या ह्या पत्नी. त्या गायिका होत्या. त्यांच्या बंगल्यावर कँपमध्येजवळजवळ दर शनिवारी भीमसेन चं गाणं असायचं. मी व मामा न चुकता जात असू.त्यावेळी तबल्याची साथ लालजी गोखले करायचे.हे नट विक्रम गोखलेंचे काका. चंद्रकांत गोखलेंंचेधाकटे भाऊ.त्यांची आई म्हणजे पहिली अभिनेत्री कमलाबाई गोखले. हार्मोनियमवर नेहमीच अप्पा जळगावकर.
घरी गाणं म्हणजे मोजकेच श्रोते ! भीमसेन असे काही जमून गायचे की बस्. सगळे दर्दी श्रोते.भिमसेनचा जणू तो रियाजच असायचा. नवीन नवीन राग.अनवट नाही पण वैविध्य. तेव्हाच मी पूरिया धनाश्री, अभोगी..दरबारी, सुहा कानडा..असे कितीतरी ! संध्याकाळ व रात्रीचे राग. मग नाट्यगीतं !ठुंबर्या.
'पानीभरेली कौन अलबेली कि नार, नैना रसीले ऽ...' आत्ता अगदी आत्ता माझ्या कानात घुमतोय् तो आवाज !
ते लाडिक स्वर आळवणं...नैना रसीले..झमाझम...अलबेऽऽऽ या ठिकाणी आवाजाची वलयं... कुठे विरली?
कुठे गेलं ते सगळं विश्व? या विश्वात काहीच नष्ट होत नाही ना? मग कुठे सापडतील ते स्वर ? तो आवाज?
कुठे?.... कुठे?... मलाच शोधायला हवं....

No comments:
Post a Comment